Minneapolis मध्ये आल्यापासून काल पहिल्यांदा मला अगदी परके असल्याची जाणीव होत होती.कारणही तसेच होते. weather.com नामक तापमापकाचा ‘पारा’ कितीतरी दिवसांनी शून्याच्या वर तब्बल १० °C ला पोचला होता. आणि बघता बघता एका रात्रीत पूर्ण जागेचा चेहरामोहराच बदलून गेला.
आमचे (म्हणजे इथे आलेल्या सर्व नवीन विद्यार्थीमंडळींचे) पहिले स्वागत अर्थातच पावसाने केले होते. ईथला पाऊसदेखील किती वेगळा वाटला होता.रस्त्यावरून वेगाने धावणाऱया गाडयांवर पावसाने काहीच फरक पडला नव्हता. पण तरीदेखील रात्री जेवायच्या सुमारास पडणारा पाऊस, त्याबरोबर अट्टाहासाने केलेला चहा,मातीच्या सुगंध आपल्यासारखा दरवळत नाही अमेरिकेत अशी मनातल्या मनात मिरवलेली प्रौढी हेदेखील स्पष्टपणे डोळ्यासमोर आहे.हे सगळे विचार मनात चालू असताना अंगावर पडणारे तुषार पावसात भिजण्याच्या आनंदापेक्षा जास्त सुखकर वाटले होते. माझा हा विचार चालू असताना समोर भिजायचा आनंद घेणाऱ्या ३ वेडया मुली बघून भिजण्यापेक्षा जास्ती मजा तर असे नुसतेच उभे राहून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आहे हेपण मला सांगावेसे वाटत होते.
नव्याची नवलाई संपून बाकी सर्व घडी नीट बसेपर्यंत थंडीची चाहूल लागलीच होती. आयुष्य़ात पहिल्यांदाच बर्फ़ बघणार या कारणाने बर्फ़ पडायची पण उत्सुकता होती.आधीच्या वर्षीच्या बर्फ़ाची छायाचित्रे बघून मानसिक तयारी करण्याबरोबर थंडीला तोंड देण्याकरता बाकी सामग्री गोळा करुन ( म्हणजे jackets,gloves तत्सम गोष्टी) मी एकदम सज्ज झालो होतो.शेवटी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बर्फ़ाला सुरुवात झाली.पहिल्या बर्फ़ात पावलांचे ठसे उमटवणे, बर्फ़ाचे गोळे (दुसऱ्यांना मारायला) बनवायचा वायफळ प्रयत्न करणे,हिमकण कसे dendritic असतात हे बघून आपले Material Science चे ज्ञान पाजळणे हे सगळे करेपर्यंत आजूबाजूला सर्व पांढरे बघायचीही सवय आपोआप होऊन गेली. नाही म्हणायला जेव्हा बर्फ़ पडतो तेव्हामात्र पावसाला तुच्छ लेखणाऱ्या गाडया मात्र हलकेच नांगी टाकतात..म्हणजे त्यांचा वेग मंदावतो. सलग ३-४ महिने असेच काढल्यानंतर मग मात्र ह्या सर्वाचा मनापासून कंटाळा यायला लागला होता. सर्व jackets अंगावरती चढवणे त्रासदायक वाटू लागले होते.आणि मग ओढ लागली होती ती वसंताची.
जसाजसा मार्च उजाडला तशी वसंताच्या आगमनाची देखील हलकीशी चाहूल लागत होती. मध्ये एकदा अशीच चक्कर मारताना हिरवी झाडे बघून माझ्या मित्राचे ," Good. Finally I can now say that I am not color blind" हया उद़्गारांना मनापासून दादही देऊन झाली होती. तरीही फक्त एका t-shirt वर बाहेर जाता येईल अशी वेळ यायला एप्रिलच्या मध्यापर्य़ंत वाट पहावी लागली. आत्ता परवा शेवटी एकदाचा तो दिवस आला. बाहेर पडल्यापडल्या सूर्यकिरणांमध्ये खरोखरीच उष्णता जाणवत होती. अख्ख्या रस्त्यावर गाडयांचा गजबजाट दिसू लागला. जनसंख्येचा विस्फोट झाल्याप्रमाणे एकदम आजूबाजूला गर्दी वाटायला लागली. एकदमच नानाविध प्रकारचे, रंगीबेरंगी पोषाख डोळ्यासमोर येऊ लागले. University मध्ये मोकळ्या जागेत छोटेखानी foodstalls मध्ये विकत असलेले hot dogs,त्याच्यामागे juggling करणारे लोक, पाठीमागे frisbie चा खेळ चालू आहे असे एकदम सहलीला आल्यावर बघायला मिळेल असे दॄश्य होते.
हे सगळे अनुभवल्यानंतर मात्र मला एकदम परक्या ठिकाणी आल्यासारखे वाटू लागले. असे का वाटते आहे ह्याचा मनाशीच छडा लावण्याचा खूप प्रयत्न केला. पण समाधान काहि झाले नाही. हे सर्व होईपर्यंत माझ्या पाठीला लावलेल्या बॅगमुळे घाम यायला सुरुवात झाली आणि मग मात्र मला बाजूच्या गर्मीचा आनंद झाला.
ह्या blog post मधील खरेतर शेवटच्याच काही ओळी लिहायच्या होत्या पण लिहिता लिहिता त्याने इथे आल्यापासून लिहावे वाटणारे एक दोन blog सामावून घेतले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
:)... chaan lihilay aahes.. tula tar mahitich aahe mala barf kiti aavaDto tay.. puN faqt kheLayalaa.. rahayalaa nako baba... mazyaa guide nay tuzyach university madhun MS Phd kele aaNi nantar barfalaa kanTaLun direct LSU madhe aale :D.. (vaLvaNTat)... tumhi puN yaa aamchyaa vaLvaNtat kadhitari !
chan lihilays..:)
Pahilya barfacha faar koutuk asata.. pan nantar sagala rotuine vatun bore hota..
Any ways.. Enjoy the summer now.. till its time to hybernate.. :D
Kadak !!
parke vaTaNyakarta parkya deshaat asaNe jaroori nasate. tula je aata vaTate aahe te mala pushkaL da ithe bharataat bangalore madhech vaaTate...
chhan lihile aahe.. liheet raha!
pun tula parke ka watat ahe? Baki comment karnyarya lokanni hyabaddal kahi kashe wicharle nahi?
Post a Comment