Tuesday, June 24, 2008

अमेरीकेत साहित्य संमेलन करणार हे जाहीर झाल्यापासून नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात झाली.त्यावर थोडे काही

साधारणपणे एक वर्षापूर्वी सकाळ मध्ये नेहमीच्या "वाचकांच्या" पत्रव्यवहारामध्ये अनेक सूज्ञ नागरीकांनी आपली परखड मते मांडली होती. विषय होता, अमेरिकेतील लोकांनी दिलेल्या देणगीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

बहुतांश लोकांनी सरळ टीकास्त्र सोडले होते जे मला काही तितकेसे पटले नाही. त्यांचा मुद्दा असा होता की भारतातून बाहेर जाऊन उगाच "शो" म्हणून केलेला हा उद्योग ,त्याचे एवढे काय कौतुक. त्यापेक्षा शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. अजून एक मुद्दा म्हणजे "या परदेशी स्थायिक मंडळींनी साजरा केलेला होलिकोत्सव कळला.त्यांनी कधी "बैलपोळा" साजरा केल्याचे आठवत नाही." ह्या २ मुद्द्यांमागचा उद्देश मला अजूनपर्य़ंत समजला नाही. शेतकरी,बैलपोळा आणि परदेशी स्थायिक मंडळी यांचा संबंध अगदीच बादरायण आहे. हे तसेच काहीसे असल्यासारखे आहे.

आपल्या मनातला पूर्वग्रह या ना त्या मार्गाने बाहेर काढण्याचा हा एक प्रकार. जर तुमचा आक्षेप परदेशात संमेलन भरवण्यालाच असेल तर माझ्या मते त्याला आखिल "भारतीय" म्हणण्याचीही काही गरज नाही. जर महाराष्ट्राबाहेर जेवढे मंडळी मराठी साहित्यात रस घेतात तेवढेच जर भारताबाहेर अमेरीकेत घेत असतील तर त्यात वावगे ते काय?

आरडाओरड करीत राहणे हे जणू आजकालचा मूलमंत्रच झाला आहे. सर्व गोष्टींमध्ये आपले नाक हे खुपसलेच पाहीजे का? breaking news च्या मागी लागून ज्यात त्यात काहीतरी खुसपट कशाला काढले पाहीजे. चिपळूण मध्ये रेल्वे स्थानकात लोक अडकून पडले की लगेच वाहीन्या आपापले कॅमेरे घेऊन पोचले तिकडे लोकांची मते विचारायला. लोक आरडाओरडा करत होते. जणू काही सरकार आणि रेल्वे व्यवस्थापनानेच मुद्दामून एवढा पाऊस पाडला आहे अशा थाटात तो बातमीदार बडबड करत होता. कोणा official ला फोन लावून लगेच studio मधून प्रश्न
बातमीदार: मदत पोचायला एवढा उशीर का होत आहे?
official: हे बघा. आमची वाहने खाण्यापिण्याच्या सामानासहीत रवाना झाली आहेत. सगळीकडेच पावसाने traffic jam झाला आहे. त्यामुळे कधी पोचेल हे आत्ताच असे काही सांगता येणार नाही
बातमीदार: आमची टीम कधीच तिथे पोचली आहे. मग तुमची गाडी का नाही पोचत?

मी सर्द. "अरे दीडशहाण्या, तू काय बोलतो आहेस.तुमची गाडी तिथे पोचली ना. मग तुम्हाला मदत का नाही नेता आली. कुठल्या तोंडाने प्रश्न विचारतो आहेस तू?"

सर्व काही आपल्या हाती असावे,किंवा आपल्या जवळपास असावे हा अट्टाहास कशाला? झाले एखादे वर्ष संमेलन तर बिघडले कुठे? ह्याच टीकेला समांतर अशी अजून एक गोष्ट म्हणजे क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन. लोकांना बघवत नाही. एक मॅच खेळून एवढे पैसे मिळवलेले बऱ्याच लोकांना पचवता येत नाही. दुसऱ्याच्या गोष्टी बघायच्याच कशाला? तुम्ही वयाच्या ५ वर्षापासून बाकीच्या गोष्टी सोडून तासंतास सराव केलाय का? तुम्ही सलग ३ महीने आपल्या कुटुंबापासून लांब राह्ताय..आपल्या मुलाशीदेखील बोलायला तुम्हाला वेळ नाही असे झाले आहे का? नाही ना? मग ह्या सर्वांचे फळ म्हणून त्यांना पैसे मिळाले तर काय वाईट आहे.

केवळ लोक परदेशात राहतात हे एक कारण टीकास्त्र सोडण्याला पुरे आहे? जरी ते परदेशात असतील तरी आहेत भारतीय,मराठीच ना. त्यांना जर एखादे साहित्य संमेलन अनुभवायचे असेल तर त्यामागे काय चूक आहे?

एकंदरीत काय, आपला तो बाब्या,दुसऱ्याचे ते कार्टं !!

दुसरे म्हणजे संमेलन कुठे का असेना, वादविवादाच्या भोवऱ्यात ते अडकले नाही तर ते संमेलनच नाही.

5 comments:

Gayatri said...

"केवळ लोक परदेशात राहतात हे एक कारण टीकास्त्र सोडण्याला पुरे आह?े"

हाच प्रश्न मला तू सांगितल्याप्रमाणे कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचला तेव्हा पडला.
संपादकमहोदयांनी अमेरिकेतील मराठी लोकांचे वाचनविश्व "फडके, खांडेकर आणि पु. ल." एवढ्यावर मर्यादित असते हा निष्कर्ष कुठून काढला?
त्यांच्या यमूआत्यांचे यजमान किंवा दामूआजोबांचे कोणसे मित्र अशा लोकांच्या मुलाखती घेऊन का?
इथे स्थायिक झालेले लोकही भारतातून टपालाने पुस्तकं मागवण्याइतपत वाचनवेडे असतात,”रसिक साहित्य’ च्या वाचनालय योजनेला भरघोस प्रतिसाद मिळतो (’शाळा’ सारखं पुस्तक मिळायला वर्षभर वाट पहावी लागते) हे यांच्या गावीही नाही का?

"आपल्या मनातला पूर्वग्रह या ना त्या मार्गाने बाहेर काढण्याचा हा एक प्रकार" हा निष्कर्ष पटलाच अगदी.

अर्थात SF ला संमेलन भरवू पाहणारे सगळेच मराठी साहित्याविषयीच्या कळकळीने भारलेले असतील असं नाही. ’मराठी साहित्य’ यापेक्षा ’संमेलन’ त्यांना जास्त प्रिय असेल..असू द्यात की! खुद्द महाराष्ट्रात तरी वेगळी परिस्थिती असते का? तिथूनच इथे आलेले लोक ना हे सारे?

हे कमी की काय म्हणून वर "संमेलन एका विशिष्ट वर्गाच्या हातात जाणार" अशा जातीयवादी बोंबा. संमेलन म्हणजे काय बास्केटबॉल आहे का चषक आहे एखादा?

सगळी गंमत आहे..नाटकासारखी पाहात बसायची.

सलिल said...

एकदम पटले. ह्याच काही ओळी माझ्याकडून राहून गेल्या होत्या त्या तू टाकल्यास.

धन्यवाद

Nikhil said...

I think you are perfectly right in being angry about this. Here is my two penny's worth...

Literature is an integral aspect of a 'culture'. And culture can and should never be bounded by the artificial confines of geography. The state of Maharashtra was born in the 1960's, (not even half a century old) and the rationale was a common language, a shared culture. Belgaum is still being fought over precisely because poeple there have a stake in this culture. Now, in the past 20 years or so, there has been a mass migration ( exodus?) of the marathi peoples to foreign shores. We have become a diaspora, and the state of maharashtra no longer has any monopoly over marathi culture, they aren't the only purveyors no more. And as geographic bonds inexorably grow weaker, it will be for the good of all to foster the more elastic bonds of culture, language and literature. At a more prosaic level, there is the small matter of financial benefactors, if Bollywood can have film premieres in NY and in Thailand, including more affluent classes in the fold of marathi literature will make the publishing industry more vibrant, leading to a trickle down effect to all the tiers of Marathi literature.

Priya said...

तुझं आणि गायत्रीचं म्हणणं अगदी पटलं, केवळ परदेशात राहतात म्हणून त्याचं साहित्यावर कमी प्रेम, किंवा कमी अधिकार आहे - असा निष्कर्ष चुकीचा आहे. पण Thik of it this way... USमध्ये दरवर्षी BMMचं अधिवेशन अगदी थाटामाटात होतंच की. मग त्यातच तुम्ही बोलवा न कोण साहित्यिक बोलवायचेत ते, आणि इतरही जे करायचंय ते करा. ’अखिल भारतीय साहित्य संमेलन’ इथे भरवून भारतातल्या रसिकांना त्यापासून एक वर्ष वंचित का करायचं? कितीही नाही म्हटलं तरी ते इथल्यापेक्षा संख्येने कितीतरी जास्त आहेत. माझ्या ओळखीचे खूप लोक दर वर्षी संमेलनाला जातात - महाराष्ट्रात जिथे असेल तिथे. त्यातले किती अमेरिकेत येऊ शकतील? - एकही नाही! त्यांना का deprive करायचं यापासून? इथल्या मराठी जनतेकडे साहित्याबद्दल आस्था आणि resources आहेत, मग त्यांनी वेगळा platform निर्माण करावा. Actually such a platform already exists in the form of BMM adhiveshan. त्यात काही additions/बदल/सुधारणा/नवे प्रयोग/भारतातून मोठ्या संख्येने साहित्यिकांचा सहभाग वगैरे करावं ना... भारतातल्या लोकांना वंचित करून इथे साहित्य संमेलन भरवण्यात मला काही पॉईंट दिसत नाही!

prasad bokil said...

ओढा लेको पैसे. खा रोज मटार उसळ खा, शिकरण खा......
एकंदरीत काय तर दुसर्याला मिळालेले पैसे हा पूर्वीपासूनच टिकेचा विषय आहे. ज्यांना फुकटचे निमंत्रण मिळाले नाही. त्यांची टिमकी वाजत राहणार. त्या कारणाने का होईना मराठी वाढत आहे. भांडणाने यमक आणि अनुप्रास सुधारतात अशी माझी थेअरी आहे.